देव विराट कोहलीला परत… सिद्धूच्या एका पोस्टने इंटरनेटवर खळबळ, चाहत्यांच्या डोळ्यात पाणी, नेमक
विराट कोहलीवर नवज्योत सिंग सिद्धू: भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या या शानदार कामगिरीने माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धूही भारावून गेले आहेत. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोहलीची बॅट चांगलीच तळपली. अवघ्या दोन सामन्यात त्याने 200 हून अधिक धावा करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. याच पार्श्वभूमीवर नवजोत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून ती पाहता पाहता व्हायरल झाली आहे. या पोस्टने विराटचे चाहतेही भावुक झाले आहेत.
विराटसाठी सिद्धूंची भावनिक पोस्ट
नवजोत सिंग सिद्धू यांनी इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फलंदाजीचा एक व्हिडीओ शेअर करत त्याला मनाला भिडणारे कॅप्शन दिले आहे. सिद्धू यांनी लिहिले की, “जर देवाने मला एक इच्छा मागण्याची संधी दिली, तर मी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती मागे घ्यावी आणि पुन्हा रेड बॉल क्रिकेट खेळावे, अशी प्रार्थना करेन.” त्यांच्या मते, असे झाले तर 1.5 अब्ज भारतीयांना सर्वाधिक आनंद मिळेल. सिद्धूंनी कोहलीच्या फिटनेसचे कौतुक करत त्याला “24 कॅरेट सोनं” असे संबोधले आणि त्याची तंदुरुस्ती आजही 20 वर्षांच्या तरुणासारखी असल्याचे म्हटले.
अचानक घेतलेली कसोटी निवृत्ती
सध्या 37 वर्षांचा असलेला विराट कोहलीने यावर्षीच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. कसोटी हा त्याचा सर्वात आवडता फॉरमॅट मानला जात होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर होण्याच्या अगदी आधी हा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. ऑस्ट्रेलियात खेळलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान त्याच्या फॉर्ममध्ये घसरण दिसून आली. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूंवर वारंवार बाद होण्याची चूक तो करत होता. पर्थ कसोटीत त्याने शतक झळकावले, मात्र त्यानंतर संपूर्ण मालिकेत तो संघर्ष करताना दिसला.
वनडेमध्ये जबरदस्त पुनरागमन
कसोटी निवृत्तीनंतर मात्र व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये विराटचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू झाला आहे. वनडेमध्ये तो सातत्याने शतके झळकावत असून ही त्याच्या दमदार पुनरागमनाची स्पष्ट खूण आहे.
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक ठोकले. याचदरम्यान विराटने स्पष्ट केले की, त्याचा संपूर्ण फोकस आता फक्त वनडे क्रिकेटवर आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याची पुनरागमनाची शक्यता जवळजवळ नाहीच.
10 हजार धावांचे स्वप्न अपूर्ण
12 मे 2025 रोजी विराट कोहलीने अधिकृतपणे कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट 9,230 धावांवर केला. अवघ्या 770 धावांनी तो 10,000 कसोटी धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठू शकला नाही, आणि हे स्वप्न अपूर्णच राहिले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.