पंतला विश्रांती, ईशान किशनची एन्ट्री? वनडे मालिकेत भारतीय संघात होणार मोठे बदल!

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. पूर्णपणे तंदुरुस्त झालेला शुभमन गिल या मालिकेत संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. मात्र, आगामी टी20 विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा विचार करता, काही दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांसारख्या खेळाडूंना वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, रिषभ पंतला आता एकदिवसीय संघातूनही वगळले जाऊ शकते. पंतच्या जागी ईशान किशनला संधी मिळू शकते.

विजय हजारे चषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. तसेच, शुबमन गिलचे पुनरागमन झाले असले तरी, ऋतुराज गायकवाडला संघात कायम ठेवले जाऊ शकते.

Comments are closed.