पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तळ्यात मळ्यात! मविआच्या बैठकीला दांडी, नेते नॉट रिचेबल

पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला  या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महाविकास आघाडीतील पक्षांशी बोलणी सुरु होती. अशातच आज पुण्यात महाविकास आघाडीची बैठक आयोजीत केली होती. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पोहोचले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे स्थानिक नेते नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी, काँग्रेस आणि ठाकरे गटाचीच चर्चा

पुण्यात महाविकास आघाडीची बैठक मात्र राष्ट्रवादीचे नेते पोहोचले नाहीच. पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक आयोजीत केली होती. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली आहे. जागावाटपावर केवळ दोन पक्षाच्या नेत्यांचीच चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीचे सगळे स्थानिक नेते नॉट रिचेबल आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीला येणे टाळल्याने पुन्हा राजकारणाला नव वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुण्यात महाविकास आघाडीच आणखी काहीच ठरत नसल्याचे दिसत आहे.

आम्ही आज रात्रीपर्यंत निर्णय घेऊन, प्लॉन बी तयार : अरविंद शिंदे

आज सकाळपासून आम्ही निवडणुकीच्या बैठकीसाठी बसलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देखील निरोप दिले होते. दुपारी येणार होते पण अजून त्यांचे नेते आले नाहीत. तरीही काल ज्या जागा त्यांना ठेवल्या आहेत त्या आजही तशाच आहेत अशी माहिती पुण काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिली. आम्ही काल तिघे बसलो आज ते नाहीत का आले नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे. आजही आम्ही त्यांची वाट पाहत आहोत.  165 जागांची आमची यादी तयार आहे. आजही त्यांना ठेवलेल्या जागा तशाच आहेत. याद्या पूर्ण झाल्या आहेत असे शिंदे म्हणाले.  मी त्यांच्या सगळ्या नेत्यांना कॉल केला त्यांचे नेते फोन उचलत नाहीत, काही नेते नॉटे रिचेबल आहेत ज्यांच्यावर जबाबदारी होती त्या सगळ्यांना फोन केल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही आज रात्रीपर्यंत निर्णय घेत आहोत. आमचा प्लॅन बी देखील तयार असल्याचे शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट परत येईल असं वाटत नाही

आमची सगळी तयारी झाली आहे.  कुणी आलं कुणी नाही आलं तरी आमची तयारी आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट पुण्यात ताकदीने लढू असे शिंदे म्हणाले. ही आघाडी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाची आहे पण आता काय होईल माहिती नाही. आम्ही वाट पाहत नाहीत आमच काम सुरू आहे. आम्ही बोलावलं होत ते निघून गेले. आज उद्या याद्या तयार होतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने आता तरी  निर्णय घेतला पाहिजे असे शिंदे म्हणाले. आम्ही 50-50 चा फॉर्मुला वाटून घेतला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट परत येईल असं वाटत नसल्याचे शिंदे म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.