Sanskrit Village : या गावात संवादासाठी वापरली जाते संस्कृत भाषा

शाळेत असताना तुम्ही नक्कीच संस्कृत भाषा शिकले असाल. संस्कृतचे श्लोक, सुभाषितं तशी कठीणचं वाटायची पण संस्कृत भाषा लिहायला, ऐकायला फार गोड.. असं म्हणतात भारतात दर 4 मैलावर भाषा बदलते. देशात विविध भाषा बोलल्या जातात त्यातील काही भाषा आता कालबाह्य होत चालल्या आहेत. त्यांपैकी एक संस्कृत.. संस्कृत पूजा-पाठ आणि मंत्रामध्ये वापरली जाते. मात्र हल्ली कोणी संस्कृत भाषेत एकमेकांशी बोलताना, भांडताना दिसत नाही. पण भारतात असे एक गाव आहे जिथे दैनंदिन व्यवहारासाठी संस्कृत भाषा वापरली जाते. आजच्या लेखात जाणून घेऊयात संस्कृत भाषा संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या या गावाविषयी.

भारतात मराठी, हिंदी, कोंकणी, गुजराती, बंगाली अशा विविध भाषा बोलल्या जातात. पण या गावातील लोक संस्कृत भाषेत बोलतात. येथे गेल्यावर अगदी भुतकाळात गेल्यासारखं वाटतं. राहण्यापासून ते अगदी बोलण्यापर्यंत येथे सर्व पारंपरिक पद्धती वापरल्या जातात. गावातील सर्वच वयोगटातील लोक फक्त संस्कृत भाषेत बोलतात. आश्चर्यांची बाब म्हणजे या गावातील हिंदूबरोबर मुस्लिम समाजसुद्धा संस्कृत भाषेतच बोलताे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत गावाच्या रस्त्यांवर लोक श्लोकाचे पठण करताना दिसतात.

मत्तूर गाव –

या अनोख्या गावाचे नाव मदुर आहे. कर्नाटकातील शिमोगा तालूक्यात हे गाव आहे. संस्कृतसोबत येथे कन्नड भाषा बोलण्यासाठी वापरली जाते. असे म्हणतात की सुमारे 600 वर्षांपूर्वी केरळवरून संकेठी ब्राम्हण समाज या गावात स्थायिक झाला आणि त्यांनी येथे संस्कृत बोलायला शिकवले.

गावात गुरुकुल पद्धत असून शाळा सुद्धा जुन्या पद्धतीच्या आहेत. येथील रस्त्यांची नावे सुद्धा संस्कृतमध्ये आहेत. मत्तूरमधील भाजी विक्रेत्यापासून ते पुजारीपर्यंत सर्वांना संस्कृत भाषा समजते. अगदी लहान मुलं भांडण करताना सुद्धा हीच भाषा वापरतात.

प्रत्येक घरात अभियंता –

गावातील शिक्षकांच्या मते, संस्कृत शिकण्यामुळे विद्यार्थांना गणिताची आणि तर्कशास्त्राची आवड निर्माण होते. याशिवाय येथील बरेच तरुण परदेशात अभियांत्रिकी किंवा वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. अभिमानाची बाब म्हणजे प्रत्येक कुटूंबात किमान एक सॉफ्टवेयर अभियंता आहे.

हेही वाचा – Temple : भारतात आहे यमाचे मंदिर, बाजूने जायलाही घाबरतात लोक

Comments are closed.