वय फक्त आकडा! 38 व्या वर्षी पोलार्डचा पराक्रम, 300 षटकारांचा ऐतिहासिक टप्पा गाठला

वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. 38 पोलार्ड त्याच्या उत्तुंग षटकारांसाठी ओळखला जातो. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळताना पोलार्डने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. स्फोटक फलंदाज किरॉन पोलार्ड टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 300हून अधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे. एमआय एमिरेट्सचा कर्णधार किरॉन पोलार्डने दुबई कॅपिटल्सविरुद्ध एका षटकात ३० धावा फटकावत चौकार मारले.

वेस्ट इंडिजचा दिग्गज आणि महान टी-20 क्रिकेट खेळाडूंपैकी एक, पोलार्डने टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 300 षटकार मारण्याचा ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. शेख झायेद स्टेडियमवर दुबई कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात, पोलार्डने त्याच्या संघाला केवळ 8 विकेटने विजयच मिळवून दिला नाही तर प्लेऑफमध्ये स्थानही मिळवून दिले. या सामन्यात पोलार्डने 31 चेंडूत 44 धावा फटकावल्या आणि पाच उत्तुंग षटकार मारले. एमआयच्या डावाच्या 15व्या षटकात पोलार्डने अफगाणिस्तानचा फिरकीपटू वकार सलामखिलला चार षटकार आणि एक चौकार मारला. वकारने या षटकात 30 धावा दिल्या.

पोलार्ड हा कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. त्याने 209 सामन्यांमध्ये 304 षटकार मारले आहेत. फाफ डू प्लेसिसने 210 सामन्यांमध्ये 286 षटकार मारले आहेत. एमएस धोनीने 331 सामन्यांमध्ये 281 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने 225 सामन्यांमध्ये 273 षटकार मारले आहेत आणि विराट कोहलीने 193 सामन्यांमध्ये 227 षटकार मारले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 षटकार मारण्याचा विक्रम अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे. त्यानंतर धोनी टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 100, 150, 200 आणि 250 षटकारांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू बनला.

Comments are closed.