वेगावर स्वार होऊन फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या ब्रेट ली चा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला सन्मान, डॉन ब्रॅडमनच्या पंगतीत समावेश

जगातील मातब्बर गोलंदाजांच्या यादीत मानाचे स्थान पटकावणाऱ्या ब्रेट लीचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा सन्मान केला आहे. ब्रेट लीने आपली कारकिर्द गाजवली आणि अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात खारीचा वाटा उचलला. त्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठीचे अमुल्य योगदान लक्षात घेऊन ब्रेट लीची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने Hall Of Fame साठी निवड केली आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये एक दादा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या नावाचा उल्लेख केला जातो. अनेक दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाने जागतिक क्रिकेटला दिले. गोलंदाजी, फलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंचा या संघात नेहमीच भरणा राहिला आहे. याच संघाच्या दिग्गज खेळाडूंमध्ये आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ब्रेट लीच्या नावाची घोषणा केली आहे. डॉन ब्रॅडमन यांचा सुद्धा Hall Of Fame मध्ये समावेश आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर ब्रेट लीने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक क्षण म्हणजे 2003 चा विश्वचषक जिंकणे आणि जेव्हा आम्ही सलग 16 कसोटी सामने जिंकले होते. आज मला मिळालेल्या या सन्मानाबद्दल मी खूप आभारी आहे. कारण खेळ त्यासाठी खेळला जातो, जेव्हा तूम्ही काहीतरी साध्य करण्याचे स्वप्न पाहता.” अस ब्रेट ली म्हणाला आहे.

Comments are closed.