शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग, शासकीय विश्रामगृहात बैठक, ठाकरे गटाचा आरोप

जळगाव : जळगावमध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केल आहे. शासकीय विश्रामगृहात महायुतीची बैठक झाल्याचा आरोप  शिवसेना आणि भाजप नेत्यांवर करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू असताना शासकीय विश्रामगृहात बैठक घेतल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. !

मंत्री गिरीश महाजन यांच्या स्पष्टीकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केली कडवट टीका केली आहे. अडीच तास वॉशरुममध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरुम मध्येच घेतल्यात का? असा सवाल त्यांन केला आहे. आमदार मंत्र्यांना देखील वॉशरुम मध्येच घेऊन जावं लागलं का?, असा सवाल संजय सावंत यांनी गिरीश महाजन यांना केला.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात दुपारनंतर महायुतीच्या जागावाटपाबाबत बैठक

जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात दुपारनंतर महायुतीच्या जागावाटपाबाबत बैठक पार पडल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. या बैठकीला मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजुमामा भोळे उपस्थित होते. महानगरपालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना शासकीय विश्रामगृहात पक्षीय बैठका घेण्यात आल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचा दावा करत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी आपण केवळ रेल्वेने प्रवास करायचा असल्याने फ्रेश होण्यासाठी पाच मिनिटांसाठी विश्रामगृहात थांबलो होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र या स्पष्टीकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जोरदार टीका करत अडीच तास वॉशरूममध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्येच घेतल्यात का? तसेच आमदार मंत्र्यांना देखील वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का?, अशी टीका करत शासनकर्ते, मंत्री नियम धाब्यावर ठेवून काम करत असतात, असेही म्हटले आहे.

गेल्या काही दिवसापासून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची युती जाहीर करण्यात आली असली तरी जागा वाटपाचा बाबत अद्यापही तडजोड झाली नाही. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीत घ्यायचे तर कोणाच्या कोट्यातून त्यांना जागा द्यायच्या या बाबत भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याच सांगितले जात आहे. त्यात आज मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत होणाऱ्या चर्चेत तोडगा निघेल आणि जागांचा तिढा सुटेल असे वाटले असतानाही तो आजही सुटू न शकल्याने मंत्री गुलाबराव पाटील हे काही वेळातच मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन,निघून गेलेत. ते संतापून निघून गेल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

गुलाबराव पाटील महाजनांना भेटण्यासाठी आले आणि लगेच निघून गेले, जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं

आणखी वाचा

Comments are closed.