पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांची घोषणा

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा रविवारी तळवडे येथे केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ तळवडे येथे फोडला. यावेळी त्यांनी शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. आज शहरामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार बोकाळला

भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर अजित पवार यांनी यावेळी तोफ डागली. ते म्हणाले, 2017 पासून महापालिकेमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक कामांमध्ये रिंग केली जाते. ठराविक लोकांनाच डोळ्यासमोर ठेवून त्यांना कंत्राट दिली जातात.

Comments are closed.