सोलापुरात पवार-शिंदे गट भाजपविरोधात लढणार

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठय़ा प्रमाणात फूट पडली असून, शिंदे गट आणि अजित पवार गटाने भाजपला दूर ठेवत युती केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपाला महापालिका सत्तेतून रोखण्यासाठी दोघेही भाजपच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या युतीची शक्यता संपुष्टात आल्या असून, महायुतीतील इतर दोन मित्रपक्ष असलेले शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी भाजपला दूर करून युती केली आहे.

आम्ही भाजपकडे 40 जागा मागितल्या होत्या. त्यांनी आम्हाला 8 जागा देऊ केल्या. आमची 26 जागांवर तडजोड करण्याची तयारी होती. या आकडय़ावर आम्ही ठाम होतो, अशावेळी भाजपकडून चर्चा थांबवण्यात आली. त्यामुळे आम्ही अजित पवार गटाशी युती केली असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी 51 जागा लढवणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडून देण्यात आली.

Comments are closed.