नंदुरबार हादरले! आश्रम शाळेतील मुलीवर मुख्यध्यापकाचा लैंगिक अत्याचार, महिला अधीक्षिकेची नराधमाल

नंदुरबार क्राईम न्यूज : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तलई येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. (Nandurbar Crime)अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या घटनेची दखल घेत प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका या दोघांनाही तात्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणात नराधम मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे आदिवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाचा लैंगिक अत्याचार, अधीक्षिकेचे संगनमत

नंदुरबारच्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेतून समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणात आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. विद्यार्थिनीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.

प्राथमिक चौकशीत शाळेच्या मुख्याध्यापकानेच विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच, या प्रकारात महिला अधीक्षिकेचेही संगनमत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून आरोपीला मदत केल्याचा ठपका अधीक्षिकेवर ठेवण्यात आला आहे.

मुख्याध्यापकासह व्यवस्थापकीचे निलंबन, आयुक्तांचे आदेश

या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. निलंबन काळात दोन्ही कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याची सक्त ताकीद देण्यात आली असून, विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर दोष सिद्ध झाल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी शासकीय आश्रम शाळा तलाईच्या मुख्याध्यापकसह वस्तीगृहाच्या व्यवस्थापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नराधम मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाहे. दुसरीकडे हि घटना उघडल्यानंतर आदिवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण बांधकाम झालं असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. तर या घटनेनं आदिवासी आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.