न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर होण्याआधीच विराट कोहलीचा मोठा निर्णय! 6 जानेवारीला पुन्हा मैदानात उत

विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी बातम्या : चाहत्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळत आहे. विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली दिल्लीसाठी पुढचा सामना कधी खेळणार? यावर आता मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. मर्यादित उपलब्धतेनंतरही विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत किमान एक सामना तरी खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार, 6 जानेवारी 2026 रोजी अलूर येथे रेल्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोहली दिल्लीकडून मैदानात उतरणार आहेत. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या आगामी वनडे मालिकेपूर्वी होणार आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, DDCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती अधिकृतपणे कन्फर्म केली आहे. ही बातमी समजताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. पुन्हा एकदा किंग कोहलीला विजय हजारे ट्रॉफीत खेळताना पाहण्याची संधी फॅन्सना मिळणार आहे.

विराट कोहलीचा फॉर्म जबरदस्त

24 डिसेंबर रोजी बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध खेळत कोहलीने घरगुती क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं. 299 धावांचा पाठलाग करताना कोहलीने 101 चेंडूत 131 धावांची अफलातून खेळी साकारली. या खेळीत त्याच्या क्लासिक शॉट्ससोबतच संतुलित आक्रमकता पाहायला मिळाली. या खेळीच्या जोरावर दिल्लीने चार विकेट्सने शानदार विजय मिळवला, तर कोहलीने लिस्ट ‘ए’ क्रिकेटमधील 16,000 धावांचा ऐतिहासिक टप्पाही पार केला. याशिवाय, क्षेत्ररक्षणातही कोहलीने कमाल करत दोन महत्त्वाचे झेल घेतले. दिल्लीने हा सामना अवघ्या 7 धावांनी जिंकला आणि कोहलीला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आलं.

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेची तयारी

विराट कोहली जानेवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताकडून खेळताना दिसणार आहेत. या मालिकेतील पहिला वनडे सामना 11 जानेवारी 2026 रोजी होणार असून एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा 3 किंवा 4 जानेवारीला होण्याची शक्यता आहे.

कोहली कधी उतरतील मैदानात?

6 जानेवारी 2026 – दिल्ली विरुद्ध रेल्वे (स्थळ : अलूर)

हे ही वाचा –

Shardul Thakur : 3 ओव्हर, 4 विकेट्स… शार्दूल ठाकूरचा कहर! टीम इंडियाचं दार पुन्हा ठोठावले, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत BCCI देणार संधी?

आणखी वाचा

Comments are closed.