फराह खानच्या भावाचा अपघात, चित्रपटाच्या सेटवरून घाईघाईने रुग्णालयात हलवले; करण्यात शस्त्रक्रिया आली – Tezzbuzz
दिग्दर्शिका फराह खानचा भाऊ आणि चित्रपट दिग्दर्शक साजिद खान याच्याबाबत अलीकडे एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान साजिद खानचा अपघात झाला, ज्यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तात्काळ त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली आणि रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली.
या घटनेनंतर साजिदच्या तब्येतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. आता यावर त्याची बहीण आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान हिने दिलासादायक अपडेट दिली आहे. फराह खानने (Farah Khan)सांगितले की साजिदची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो आता बरा होत आहे. फराह म्हणाली, “सर्जरी झाली आहे आणि तो आता पूर्णपणे ठीक आहे.” या वक्तव्यानंतर साजिदच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगदरम्यान तो अचानक घसरला आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पूर्णपणे बरे होण्यासाठी त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात साजिद खानने आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला होता. हा वाढदिवस त्याने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत साधेपणाने साजरा केला होता. यावेळी फराह खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये साजिद केक कापताना दिसत होता आणि मित्र त्याच्यासाठी वाढदिवसाचे गाणे गात होते. त्या पोस्टसोबत फराहने भावनिक कॅप्शन लिहून भावाला शुभेच्छा दिल्या होत्या.
साजिद खानने आपल्या करिअरची सुरुवात VJ म्हणून केली होती. 2006 साली आलेल्या हॉरर अँथॉलॉजी चित्रपट ‘डरना जरूरी है’ मधील एका शॉर्ट स्टोरीचे दिग्दर्शन करत त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हे बेबी’ या चित्रपटाने त्याला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर 2010 मध्ये आलेल्या ‘हाउसफुल’ चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. ‘हाउसफुल 2’च्या ब्लॉकबस्टर यशानंतर साजिदला हिट दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.
मात्र पुढे आलेले ‘हिम्मतवाला’ आणि ‘हमशकल्स’ हे चित्रपट अपयशी ठरले. त्याचबरोबर लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे त्याला ‘हाउसफुल 4’सारख्या मोठ्या प्रोजेक्टमधूनही बाहेर काढण्यात आले होते. बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर साजिद पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र या अपघातामुळे त्याच्या कामावर तात्पुरता ब्रेक लागला आहे. सध्या त्याची प्रकृती सुधारत असून, हेच त्याच्या कुटुंबीयांसह चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
थलापथी विजयला पाहण्यासाठी उसळली प्रचंड गर्दी, एअरपोर्टवर तोल जाऊन पडला अभिनेता; व्हिडिओ चर्चेत
Comments are closed.