आज स्टार, पण कधीकाळी संघर्षच संघर्ष; कधी ईशान खट्टरला उचलून सेटवर नेलं, कधी संजय दत्तची लाश बनला, तर कधी सुनील शेट्टीचा डुप्लिकेट – Tezzbuzz

२०२५ हे वर्ष अभिनेता विनीतकुमार सिंगच्या (Vineet Kumar Singh)करिअरसाठी मैलाचा दगड ठरत आहे. जवळपास वीस वर्षे चित्रपटसृष्टीत संघर्ष करत, छोट्या भूमिका आणि सेटवरील कामांमधून अनुभव घेतल्यानंतर अखेर त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. ‘छावा’ आणि ‘सुपरबॉयज ऑफ मालेगाव’ या चित्रपटांमधील दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मने जिंकली आहेत.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान विनीतने आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. अभिनय हे आपलं स्वप्न होतं, पण सुरुवातीच्या काळात जगण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचं त्याने सांगितलं. ‘युवा’च्या ऑल-स्टार राउंडटेबलमध्ये सहभागी होताना विनीतने एक खास आठवण सांगितली. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटात तो असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. त्याच चित्रपटात ईशान खट्टर बालकलाकार म्हणून होता. विनीत हसत सांगतो की, “त्या काळात मी ईशानला गोदेत घेऊन सेटवर आणायचो.”

तो म्हणाला की, अभिनेता होण्याचं स्वप्न मनात होतं, पण त्या काळात परिस्थितीशी झुंज देणं जास्त महत्त्वाचं होतं. “जगायचं होतं, टिकायचं होतं. परिस्थितीसमोर हार मानली असती, तर कथा तिथेच संपली असती,” असं तो म्हणाला.

संघर्षाच्या काळात विनीतला अनेक अशी कामं करावी लागली, ज्याबद्दल सहसा कुणी बोलत नाही. कधी तो सुनील शेट्टीचा डुप्लीकेट होता, तर कधी संजय दत्तसाठी एका सीनमध्ये मृतदेहाची भूमिका केली होती. मात्र त्याने हे कधीही अपमान म्हणून पाहिलं नाही. “आग आतमध्ये जिवंत ठेवायची आणि पुढे चालत राहायचं,” हेच त्याचं सूत्र होतं.

विनीत कुमार सिंहने २००२ मध्ये संजय दत्तच्या ‘पिता’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढील अनेक वर्षे त्याने छोट्या भूमिका केल्या. २०१२ मध्ये अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ मधील भूमिकेमुळे त्याला थोडी ओळख मिळाली. २०१८ मधील ‘मुक्काबाज’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसल्यानंतर त्याच्या अभिनयाची खरी दखल घेतली गेली. त्यानंतर ‘बार्ड ऑफ ब्लड’ आणि ‘रंगबाज’ सारख्या वेब सीरिजमुळे त्याची लोकप्रियता वाढली.

२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपट ‘छावा’ मध्ये कवी कलशच्या भूमिकेतून विनीत कुमार सिंहने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. याशिवाय तो नुकताच ‘तेरे इश्क’ या प्रोजेक्टमध्येही सहाय्यक भूमिकेत झळकला आहे.दीर्घ संघर्ष, संयम आणि मेहनतीच्या जोरावर मिळालेलं हे यश अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘काका, तुमच्या मुलीएवढीच आहे मी…’ लाईव्ह शो थांबवत धडाकेबाज गायिकेचा संताप, गैरवर्तन करणाऱ्याची घेतली खरडपट्टी

Comments are closed.