चॅम्पियन्स ट्रॉफीपासून महिलांच्या वर्ल्ड कप विजयापर्यंत, भारतीय क्रिकेटचे 4 सुवर्णक्षण!

साल 2025 भारतीय क्रिकेटसाठी भावना, चढ-उतार आणि ऐतिहासिक कामगिरीने भरलेले राहिले. कुठे पराभवाने निराश केले, तर कुठे विजयाने चाहत्यांना जल्लोष करण्याची पूर्ण संधी दिली. विशेष बाब म्हणजे पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी असे क्षण दिले, जे क्रिकेट प्रेमी दीर्घकाळ लक्षात ठेवतील. चला तर मग, 2025 मधील त्या पाच मोठ्या क्रिकेटिंग क्षणांवर नजर टाकूया, ज्यांनी हे वर्ष खास बनवले.

2025 मधील सर्वात मोठा आणि भावूक क्षण भारतीय महिला क्रिकेट संघाचा वर्ल्ड कप विजय हा होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कपचे विजेतेपद आपल्या नावावर केले. स्पर्धेची सुरुवात सोपी नव्हती. सुरुवातीच्या विजयानंतर संघाला सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला, मात्र ‘करा किंवा मरा’ अशा निर्णायक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने पुनरागमन केले. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 339 धावांचे ऐतिहासिक लक्ष्य गाठून संघ फायनलमध्ये पोहोचला आणि तिथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून इतिहास रचला.

महिला संघासोबतच पुरुष संघानेही चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारतासाठी अत्यंत खास ठरली. ग्रुप स्टेजमध्ये भारताने बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा बदला घेण्यात आला. फायनलमध्ये न्यूझीलंडला मात देऊन भारताने 12 महिन्यांत दुसरी आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकली.

आशिया कप 2025 हा भावनिकदृष्ट्या देखील विशेष राहिला. सीमेवरील तणावाच्या वातावरणादरम्यान भारताने मैदानावर शानदार कामगिरी केली. ग्रुप स्टेजपासून सुपर-4 आणि त्यानंतर फायनलपर्यंत भारताने पाकिस्तानला जोरदार टक्कर देत प्रत्येक वेळी धूळ चारली. फायनलमध्ये तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने विजेतेपद पटकावले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सोपा नव्हता. भारत मालिकेत पिछाडीवर होता, पण शेवटच्या कसोटीत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी कमाल केली. शेवटच्या दिवशी इंग्लंडचा सहा धावांनी पराभव करून भारताने मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. हा विजय जिद्द आणि संघर्षाचे उत्तम उदाहरण ठरला.

Comments are closed.