विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची जादू कायम! बंगालला मिळवून दिला आणखी एक विजय
विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची (Mohmmed Shami) दमदार कामगिरी चंदीगडविरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाली. शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. बंगालने या अटीतटीच्या सामन्यात चंदीगडचा 6 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत शमीने आतापर्यंत एकूण 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. चंदीगडविरुद्ध गोलंदाजी करताना शमीने एक ओव्हर निर्धाव (Maiden) देखील टाकली.
शमीला विकेट्स घेण्यात यश मिळत असले, तरी तो धावा रोखण्यात काहीसा अपयशी ठरत आहे. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात शमीने 9.2 षटकांमध्ये 69 धावा दिल्या. याआधी विदर्भ विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने 10 षटकांमध्ये 65 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या.
मोहम्मद शमी गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2025 मध्ये खेळला होता. त्यानंतर अद्याप त्याला टीम इंडियात पुनरागमन (Comeback) करता आलेले नाही.
Comments are closed.