Latur Crime News – ​निलंग्यात नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीवर पोस्को, ॲट्रॉसिटीसह अपहरणाचा गुन्हा दाखल

निलंगा शहरात एक काळिमा फासणारी घटना घडली असून, एका पाशवी वृत्तीच्या ऑटो चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, निलंगा पोलिसांनी आरोपीला मध्यरात्री बेड्या ठोकल्या आहेत.

​नेमकी घटना काय?

निलंगा शहरातील पारधी वस्ती परिसरात ही घटना घडली. पीडित मुलगी दुपारी घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपी योगेश खोमणे (रा. पेठ निलंगा) याने दारूच्या नशेत तिच्या घरात प्रवेश केला. नराधमाने पिडीतेवर बळजबरीने अत्याचार केला आणि त्यानंतर तिला रिक्षामध्ये घालून पळवून नेले. या कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

​पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत असताना मध्यरात्री पेठ परिसरातून आरोपी योगेश खोमणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात  खालील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे: ​बलात्कार ​अपहरण ​ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) पोक्सो  बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार निलंगा पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
च्या
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे हे करत आहेत. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

Comments are closed.