विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरची कामगिरी कशी? लखनऊ सुपर जायंट्सला मोठ्या अपेक्षा!

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सध्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये गोवा क्रिकेट संघाकडून वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू (All-rounder) खेळाडू म्हणून खेळत आहे. विशेष म्हणजे, आगामी आयपीएलमध्ये अर्जुनने आपली टीम बदलली असून, तो आता मुंबई इंडियन्सऐवजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळताना दिसणार आहे.

अर्जुन तेंडुलकरला या स्पर्धेत अद्याप आपली छाप पाडता आलेली नाही. हिमाचल प्रदेशविरुद्ध अर्जुनने फलंदाजीमध्ये नाबाद 1 धाव केली, पण गोलंदाजीमध्ये तो खूप महागडा ठरला. त्याने फक्त 6 षटकांमध्ये 58 धावा लुटवल्या. सिक्किमविरुद्ध सामन्यात त्याने 8 व्या क्रमांकावर येत 26 चेंडूत 19 धावा केल्या. गोलंदाजीची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 5 षटकांमध्ये 17 धावा केल्या पण त्याने 9 षटकांचा स्पेल संपेपर्यंत 49 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

आयपीएल 2026 च्या मिनी लिलावापूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससोबत खेळाडूंची अदलाबदल (Trade) केली. या ट्रेडमध्ये मुंबईने लखनऊचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरला आपल्या संघात घेतले, तर अर्जुन तेंडुलकर आता लखनऊच्या ताफ्यात दाखल झाला आहे. लखनऊ संघाने अर्जुनवर मोठा विश्वास दाखवला असून, त्याला यंदा मैदानात उतरण्याची जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आयपीएलमधील त्याची आतापर्यंतची कामगिरी सरासरी राहिली असल्याने, स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.

Comments are closed.