वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या 5 मोठ्या अपडेट्स समोर! संघात होऊ शकतात मोठे बदल

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघात महत्त्वाचे बदल होणार आहेत. आगामी वनडे मालिकेसाठी शुबमन गिल (Shubman gill) भारतीय संघाचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये शुबमन गिल जखमी झाल्यामुळे केएल राहुलने (KL Rahul) कर्णधारपद सांभाळले होते, पण आता गिल पूर्णपणे फिट असून तोच कॅप्टन असेल.

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचे (Shreyas iyer) संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनला (Ishaan kishan) वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते. खराब फॉर्ममुळे ऋषभ पंतला (Rishbh Pant) संघातून डच्चू मिळू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्येही (Domestic Cricket) त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

कामाचा ताण (Workload) लक्षात घेता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah & hardik pandya) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांना या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

Comments are closed.