संदीप दीक्षित यांच्यावर काँग्रेसची नवी जबाबदारी

‘रचनात्मक काँग्रेस’चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

वृत्तसंसस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस पक्षात झालेल्या एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक बदलात, पक्ष नेतृत्वाने ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांची ‘रचनात्मक काँग्रेस’चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तात्काळ लागू झाली आहे. पूर्वी ‘आउटरीच सेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रचनात्मक काँग्रेसचा विस्तार आता नवीन स्वरूप आणि विस्तारित भूमिकेसह केला जात आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने जारी केलेल्या निवेदनावर एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची स्वाक्षरी आहे. पक्षाची वैचारिक आणि धोरणात्मक ताकद आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्षांनी ही नियुक्ती केली आहे.

‘रचनात्मक काँग्रेस’ हे एक समर्पित व्यासपीठ म्हणून विकसित केले जात असून ते नागरी समाज गट, विषय तज्ञ, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि समस्या-आधारित संघटनांशी थेट संवाद स्थापित करेल. विविध सामाजिक, आर्थिक आणि धोरणात्मक विषयांवर अर्थपूर्ण चर्चांना चालना देणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे पक्षाला समाजातील विविध घटकांशी जोडण्यास, नवीन कल्पनांचा शोध घेण्यास आणि सार्वजनिक हिताच्या मुद्यांवर ठोस धोरणे तयार करण्यास मदत होईल. ‘रचनात्मक काँग्रेस’च्या माध्यमातून पक्ष नेतृत्वाला प्रत्यक्ष अनुभव आणि तज्ञांकडून काही सूचना मिळणार असल्याने रणनिती ठरविणे सोयीस्कर होणार आहे.

Comments are closed.