मांडेची विश्वविजेत्या मोरेवर मात

जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या सामन्यात माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संजय मांडेने फॉर्मात असलेल्या मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 19-24, 11-8 व 25-19 असे हरवून स्पर्धेत खळबळ माजवली. पहिला सेट प्रशांतने जिंकला होता; परंतु अनुभवाच्या जोरावर आणि चिवट झुंज देत संजयने दुसरा सेट जिंकून सामन्यात बरोबरी केली. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये संजयने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. परंतु तरीही फॉर्मात असलेल्या प्रशांतने सहाव्या बोर्डनंतर 19-18 अशी 1 गुणांची आघाडी घेतली होती. मात्र सातवा बोर्ड संजयने 7 गुणांचा घेत बाजी मारली. महिलांच्या गटात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने अग्रमानांकित ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरवर 21-17, 13-20 व 24-17 असा चुरशीचा विजय मिळून उपांत्य फेरीत मजल मारली.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे बाहेर काढणे ः संजय मांडे (मुंबई)-प्रशान मोरे (मुंबई) 19-24, 11-8, 25-19 ; झाविद अहमद फकुन (ठाणे)-महंमद गुफ एन (मुंबई) 25-16, 23-17 ; सागर वाघमारे (पुणे) वाय एल्डर ट्रिपानियन (पुणे) 25-9, 25-11; सिद्धांत वावलकर (मुंबई)- सौरभ मत्ते (मुंबई) 25-2, 25-18.

Comments are closed.