पगार वाढल्यानंतर खर्चही वाढतोय ? मग असा करा कंट्रोल

आजच्या काळात प्रत्येक जण जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अहोरात्र कष्टही केले जातात. त्यातूनच मग प्रमोशन होऊन पदाबरोबरच पगारही वाढतो. वाढलेला पगाराचा आकडा बघून आता पैशांचे टेन्शन नाही असा विचार करतो. पण पगार वाढूनही महिनाअखेरला अनेकजणांची बचतीच्या नावाने बोंब असेल तर मात्र ही विचार करण्याची बाब आहे. कारण जर पगार वाढूनही तुमची सेविंग्ज होत नसेल तर याचा अर्थ तुमचे पैशांचे नियोजन योग्य नाही. यामुळे अशा परिस्थितीत काय करावे ते समजून घेणे आवश्यक आहे.

पगार वाढला की आपला लाईफस्टाईल स्डँर्डडही वाढतो. पैसे खर्च करण्याची कुवत वाढते. यातून मग आम्ही किती पैसेवाले, हायफाय आहोत हे इतरांना दाखवण्याचा नादच लागतो. म्हणूनच जास्तीचा पैसा आला कि सर्वसामान्य व्यक्ती ब्राण्डेड कपडे, खाणंपिणे, फिरणे, पार्ट्या, ऑनलाईन शॉपिंग, हॉटेलिंग यांवर जास्त खर्च करू लागतो. पण ज्यावेळी महिन्याच्या अखेरीस बँकेत कमी पैसे असल्याचे कळते तेव्हा मात्र उगाच अनावश्यक पैसे खर्च केल्याची मनाला चुटपूट लागते. पण ही परिस्थिती टाळणे सहज शक्य आहे.

त्यासाठी दरमहिन्याला बँक अकाऊंटमध्ये पगाराच्या ३०-४० टक्के रक्कम सेविंग मध्ये टाकावी.

उगाच मोठेपणा मिरवण्याआधी तुम्हाला खरचं त्या महागड्या ड्रेसेसची, मोबाईलची, पार्टीची गरज आहे का याचा विचार करावा.

बँक अकाऊंटमध्ये ऑटो सेविंग सिस्टम ठेवावी. जेणेकरून पगाराची रक्कम अकाऊंटमध्ये येताच त्यातील ठराविक रक्कम एसआयपी, आरडी किंवा इमरजन्सी फंडमध्ये आपोआपच वळती होईल.

पण त्याचबरोबर रोजचा जमा खर्च लिहण्य़ास विसरू नये.. त्यामुळे तुमच्याकडून कुठे आणि कोणत्या वस्तूंवर अनावश्यक खर्च होतोय हे लक्षात येते आणि अनावश्यक खर्च टळतो.

Comments are closed.