सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत रितेश देशमुखसाठी खास सरप्राइज, भाईजानने स्वतः बनवली चटपटी भेळ – Tezzbuzz
२७ डिसेंबर रोजी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने आपला ६० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर आयोजित या खास पार्टीला कुटुंबीयांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता सलमान खानचा एक खास व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे.
या व्हिडिओमध्ये सलमान खान अभिनेता रितेश देशमुखसाठी (Riteish Deshmukh)स्वतःच्या हाताने मसालेदार भेळ बनवत असल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या स्टाइलमध्ये तयार केलेली ही भेळ पाहून चाहते भारावून गेले आहेत. सुपरस्टार असूनही सलमानचा साधेपणा आणि आपुलकी पाहून सोशल मीडियावर त्याचं कौतुक केलं जात आहे.
हा व्हिडिओ अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सलमान खानसारखा कोणीच नाही. तो प्रत्येकाला घरी असल्यासारखं आणि खास वाटावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. यावेळी त्याने स्वादिष्ट ‘भौंची भेळ’ वाढली. आम्हाला खूप प्रेम दिलंत!”
व्हिडिओ समोर येताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “आम्हालाही ही खास भेळ खायची आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “हे खूपच चविष्ट दिसत आहे.” आणखी एका चाहत्याने म्हटलं, “भाईजान, तुम्ही पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकलीत.”
दरम्यान, सलमान खानच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. कतरिना कैफ, अनिल कपूर, संजय दत्त, चिरंजीवी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाईजानसाठी प्रेम व्यक्त केलं. पनवेल फार्महाऊसवर झालेल्या या ग्रँड सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्रभासच्या ‘द राजा साब’ ट्रेलर रिलीज; संजय दत्त नव्हे तर ६६ वर्षांची अभिनेत्री बनली कथेतली खरी जान
Comments are closed.