ऋषभ पंत OUT, इशान किशन IN…; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playi

न्यूझीलंड मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ: भारतीय संघ 2026 मध्ये वनडे क्रिकेटने सुरुवात करणार आहे. न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. 11 ते 18 जानेवारीदरम्यान वनडे मालिका खेळवली जाणार असून, अद्याप टीम इंडियाचा अधिकृत संघ जाहीर झालेला नाही. मात्र, या मालिकेआधीच एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे, वनडे संघातून ऋषभ पंतची गच्छंती होण्याची शक्यता असून, ईशान किशनची एन्ट्री होऊ शकते.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ या आठवड्याच्या अखेरीस जाहीर होऊ शकतो. या संघात निवड समिती मोठा निर्णय घेत ऋषभ पंतला वगळून ईशान किशनला संधी देण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, नुकतेच ईशान किशनला टी-20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेच्या संघातही स्थान मिळाले आहे.

ऋषभ पंत आऊट, इशान किशन इन…

टी-20 संघातून आधीच बाहेर असलेल्या ऋषभ पंतचे आता वनडे संघातील स्थानही धोक्यात आले आहे. पंतने आपला शेवटचा वनडे सामना 7 ऑगस्ट 2024 रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या संघात होता, मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. आता निवड समिती वनडे संघातूनही त्याला वगळण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

ईशान किशनची दमदार कमबॅकची तयारी

विजय हजारे ट्रॉफी 2025-26च्या पहिल्याच सामन्यात 33 चेंडूमध्ये शतक झळकावणाऱ्या ईशान किशनची वनडे संघात पुनरागमन होऊ शकते. ईशानने भारतासाठी शेवटचा वनडे सामना 2023 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. त्या वेळी तो आजारी शुभमन गिलच्या जागी राखीव सलामीवीर म्हणून संघात होता. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दुहेरी शतकाचाही विक्रम आहे.

ईशान किशनचा टीम इंडियासाठी ‘ट्रिपल फायदा’

ईशान किशनची निवड झाल्यास तो टीम इंडियासाठी तीन प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. तो विकेटकीपर आहे, सलामीवीर म्हणून खेळू शकतो आणि गरज पडल्यास मधल्या फळीतही प्रभावी भूमिका बजावू शकतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने क्रमांक 6 आणि सातवर फलंदाजी करून स्वतःला या भूमिकेसाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.

याआधीही ईशानने मधल्या फळीत खेळताना भारतासाठी मोलाची कामगिरी केली आहे. आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कठीण परिस्थितीत त्याने भारताला सावरण्यात मोठी भूमिका बजावली होती. नोव्हेंबर 2023 नंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता आणि एका टप्प्यावर त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही वगळण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती बदलत आहे, ईशान किशन पुन्हा एकदा स्टार बनण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, कुलदीप यादव.

न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारताची संभाव्य Playing XI : शुभमन गिल (कर्ंधर), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.

(टीप : प्रमुख टी-20 खेळाडू अर्शदीप, बुमराह, अक्षर, तिलक आणि हार्दिक यांना विश्रांती दिली जाऊ शकते.)

आणखी वाचा

Comments are closed.