इंडोनेशियात वृद्धाश्रमाला आग, 16 जणांचा मृत्यू

इंडोनेशियातील एका वृद्धाश्रमाला लागलेल्या भीषण आगीत 16 वयोवृद्ध व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला आहे. इंडोनेशियातील सुलावासी प्रांतात ही दुर्दैवी घटना घडली. येथील एक मजली इमारतीत हे वृद्धाश्रम चालवले जात होते.
यामध्ये निवृत्त झालेले कर्मचारी राहत होते. रिटायरमेंट होममध्ये सर्व जण झोपलेले असतानाच ही आग लागली. यात 15 लोकांचा होरपळून, तर एकाचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

Comments are closed.