Bath : थंडीत गरम पाण्याने अंघोळ करणे पडू शकते महागात
सर्वत्र गुलाबी थंडी पडली असून ऋतूप्रमाणे शरीरात अनेक बदल होऊ लागले आहेत. कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा यासाठी अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र कडक गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय महागात पडू शकते. या सवयीमुळे त्वचा लाल होणे, हातावर पुरळ येणे आदी समस्या सुरू होतात. अशावेळी थंडीत गरम पाण्याने अंघोळ करताना एक्सपर्ट्स काय सांगतात जाणून घेऊयात सविस्तरपणे,
एक्सपर्ट्स काय सांगतात?
एक्सपर्टच्या मते थंडीत कडक गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी. कडक गरम पाणी शरीराला सहन होत नाही. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. खूप गरम पाण्यामुळे अंघोळ केल्याने त्वचेचे आजार होतात. ज्यात सोरायसिस, एक्झिमा यांसारख्या आजारांचा समावेश असतो.
याउलट जेव्हा तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ करता तेव्हा रक्ताभिसरण व्यवस्थित होते. दिवसभर फ्रेश वाटते. कोमट पाण्याने अंघोळ केल्यावर मॉइश्चरायझर वापरा. रसायने असलेल्या साबणाने अंघोळ करणे टाळा.
थंड पाण्याने अंघोळ करू शकता का?
एक्सपर्ट्सच्या मते, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे नुकसानकारक नाही. मात्र ज्यांना नेहमी थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय आहे अशांनीच थंड पाण्याने अंघोळ करावी. ज्या लोकांना श्वसनाशीसंबंधित आजार आहेत त्यांनी चुकूनही थंड पाणी वापरू नये.
हेही वाचा – Blue Turmeric: पिवळ्या हळदीपेक्षा वेगळी, जाणून घ्या निळ्या हळदीचे महत्त्व
Comments are closed.