ट्विंकल खन्नाची ‘किक’ आणि अक्षय कुमारची मजेशीर पोस्ट, पत्नीच्या वाढदिवसादिवशी सुपरस्टारने जिंकली चाहत्यांची मने – Tezzbuzz
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्यातील गोड आणि खट्याळ नातं चाहत्यांना नेहमीच भावत आलं आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमळ टोमणे मारताना दिसतात. नुकताच ट्विंकल खन्नाचा ५२ वा वाढदिवस साजरा झाला आणि या खास दिवशी अक्षय कुमारने (Akshay Kumar)तिच्यासाठी एक मजेदार आणि हटके पोस्ट शेअर केली, जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
अक्षयने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ट्विंकल गंभीर चेहऱ्याने उभी असून तिचा पाय अक्षयकडे उचललेला दिसतो, जणू काही ती त्याला लाथ मारणार आहे. दुसरीकडे, अक्षय हसत तिचा पाय पकडताना दिसतो. दोघेही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत असून ट्विंकलने बेज रंगाचा स्वेटर परिधान केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना दोघांमधील मजेशीर केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.
या फोटोसोबत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रत्येक अॅक्शन हिरोच्या मागे अशी बायको असते जी त्याला एका नजरेने किंवा एका लाथेने खाली आणू शकते. मिसेस फनीबोन्स, तुम्ही मला कोणत्याही स्टंटपेक्षा जास्त मारलं आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, प्रेम.”
ही पोस्ट शेअर होताच चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येऊ लागल्या. कुणी ट्विंकलला “मिसेस खिलाडी कुमार” म्हटले, तर कुणी “ही जोडी खरंच परफेक्ट आहे” अशी प्रतिक्रिया दिली. काही चाहत्यांनी अक्षयला पुन्हा फुल-ऑन अॅक्शन चित्रपटात पाहण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचे लग्न जानेवारी २००१ मध्ये झाले. त्यांना दोन मुले आहेत — मुलगा आरव आणि मुलगी नितारा. चित्रपटसृष्टीपासून दूर राहून ट्विंकलने लेखिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’, ‘पायजामाज आर फॉरगिव्हिंग’ आणि ‘वेलकम टू पॅराडाईज’ ही तिची लोकप्रिय पुस्तके आहेत.
कामाच्या आघाडीवर पाहिल्यास, अक्षय कुमार लवकरच प्रियदर्शन दिग्दर्शित हॉरर-कॉमेडी ‘भूत बंगला’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तब्बू आणि परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अक्षयकडे ‘वेलकम टू द जंगल’, ‘हेरा फेरी ३’ आणि प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ हे चित्रपटही पाइपलाईनमध्ये आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
गोविंदाने केली पुनरागमनाची पुष्टी; म्हणाला, ‘हिरो नंबर वन येत आहे.’
Comments are closed.