नवे वर्ष, नवी संधी; रेल्वेत 22 हजार पदांची ‘मेगा भरती!’

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी) अंतर्गत भारतीय रेल्वेत तब्बल 22 हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती नव्या वर्षात म्हणजेच 2026 मध्ये करण्यात येणार असल्याने बेरोजगार तरुणांना नव्या वर्षात नवी संधी मिळणार आहे. आरआरबीअंतर्गत ग्रुप डीअंतर्गत असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रकमन आणि ट्रकमेंटेनर अशी एकूण 22 हजार पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी येत्या 21 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार असून अखेरची तारीख 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय पास असायला हवा. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://indianrailways.gov.in वर देण्यात आली आहे.
आणखी 311 पदांसाठी भरती
भारतीय रेल्वेत आणखी 311 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर 15, लॅब असिस्टंट ग्रेड-2 39, चीफ लॉ असिस्टंट 22, ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी 202, स्टाफ ऍण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर 24, पब्लिक प्रॉसिक्यूटर 07, सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग) 02 पदे अशी एकूण 311 पदे भरली जाणार आहेत. 30 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार असून अर्ज करण्याची अखेरची तारीख 29 जानेवारी 2026 पर्यंत आहे. या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://indianrailways.gov.in वर देण्यात आली आहे.

Comments are closed.