ज्याच्यावर IPL बॅन, तोच बनला कॅप्टन! टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी इंग्लंड संघाची घोषणा, कोणत्या 15
ICC T20 विश्वचषक 2026 साठी इंग्लंड संघ : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये टी20 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. यंदा या प्रतिष्ठेच्या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. टीम इंडियाचा संघ आधीच जाहीर झाला असून, आता एकामागोमाग एक इतर संघांच्याही घोषणा होत आहेत. अशातच इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डने (ECB) आपल्या संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे संघाची धुरा हॅरी ब्रूककडे सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे हॅरी ब्रूक सध्या आयपीएलमधून दोन वर्षांसाठी बंदी घातलेला खेळाडू आहे.
टी20 विश्वचषक आणि श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी एकच संघ
इंग्लंडचा संघ टी20 विश्वचषकासोबतच श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठीही जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही स्पर्धांसाठी एकच संघ निवडण्यात आला असला, तरी काही खेळाडूंविषयी वेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फक्त टी20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे, तर ब्रायडन कार्स फक्त श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात असेल. हॅरी ब्रूककडे कर्णधारपद देण्यात आले असून, माजी कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्ट यांनाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय विल जॅक्स आणि सॅम करन यांचाही इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
8 फेब्रुवारीला विश्वचषकातील पहिला सामना
टी20 विश्वचषकात इंग्लंडचा संघ ‘ग्रुप सी’ मध्ये आहे. या गटात इंग्लंडसोबत नेपाळ, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि इटली या संघांचा समावेश आहे. इंग्लंड आपला पहिला सामना 8 फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्ध खेळणार असून, हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. गटातील सर्वात कठीण आव्हान इंग्लंडसमोर वेस्ट इंडिजकडून असेल, तर उर्वरित संघ तुलनेने कमकुवत मानले जात आहेत.
हॅरी ब्रूकवर आयपीएलमधून दोन वर्षांची बंदी
हॅरी ब्रूकबाबत बोलायचे झाल्यास, मागील वर्षी आयपीएल संघात निवड झाल्यानंतरही ऐनवेळी माघार घेतल्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर दोन वर्षांची आयपीएल बंदी घातली होती. त्यामुळे यंदाही हॅरी ब्रूक आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. आता त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ टी20 विश्वचषकात कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
2026 च्या टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ (England Squad For ICC T20 World Cup 2026) –
हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडेन कार्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल साल्ट, जोश टोंगे आणि ल्यूक वूड.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.