सूर्यकुमार मला सारखे मेसेज करायचा; बोल्डनेससाठी चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर खुशी मुखर्जी: आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री, मॉडल खुशी मुखर्जी (Khushi Mukherjee) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड फॅशन चॉईसमुळे तिच्या चर्चा नेहमीच रंगतात. खुशी मुखर्जीचे आगळे वेगळे आऊटफिट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता खुशी मुखर्जीनं केलेल्या टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबाबत केलेलं वक्तव्य जोरदार व्हायरल होत आहे. खुशी मुखर्जी जे म्हणतेय, ते ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत खुशी मुखर्जीनं टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत एक वक्तव्य केलेलं. ती म्हणाली की, अनेक क्रिकेटपटू तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होते. तिनं खुलासा केला की, सूर्यकुमार यादव देखील पूर्वी तिला खूप मेसेज करायचे. दरम्यान, खुशीनं स्पष्टपणे सांगितलंय की, ते आता संवाद साधत नाहीत आणि तिला कोणत्याही लिंक-अप किंवा अफवांमध्ये सहभागी व्हायचं नाही.
खुशी मुखर्जी नेमकं काय म्हणाली?
खुशी मुखर्जी म्हणाली की, “कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे लागलेले… सूर्यकुमार यादव तर मला खूप मेसेज करायचा, पण आता आमचं जास्त बोलणं होत नाही… मला त्याच्याशी जोडलं जायचं नाही, मला माझ्यासोबत कोणत्याही लिंक-अपमध्ये रस नाही. त्यामुळे खरं तर कोणताही लिंक-अप नाहीये…”
कोण आहे खुशी मुखर्जी?
साऊथ फिल्म्ससोबतच रिअॅलिटी शो आणि बोल्ड वेब सीरिजमध्ये काम करणारी खुशी मुखर्जी बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतं. 24 नोव्हेंबर 1996 रोजी कोलकाता इथे जन्मलेली खुशी 2013 मध्ये तमिळ सिनेमा अंजली थुराईद्वारे तिनं तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर ती ‘डोंगा प्रेमा’ आणि ‘हार्ट अटॅक’ सारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये आणि त्यानंतर हिंदी चित्रपट ‘श्रृंगार’ मध्ये दिसली. दरम्यान, तिला मोठा ब्रेक भारतीय टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोमधून मिळाला.
एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सव्हिला 10’ आणि ‘लव्ह स्कूल 3’ मध्ये भाग घेतल्यानंतर खुशीला ओळख मिळाली. ती बालवीर रिटर्न्समधील ज्वाला परी आणि पौराणिक नाटक ‘कहत हनुमान जय श्री राम’ सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहे. अडल्ट-थीम असलेल्या भारतीय वेब सिरीजमध्येही खुशी मुखर्जीनं काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.