रडारड, घोषणाबाजी अन् पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा

छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षात तिकीट वाटपावरून नाराजीचा सूर उमटला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संभाजीनगर येथील कार्यालयाबाहेर तुफान राडा घातला आहे. तिकीट नाकारल्याने महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात जाऊन गोंधळ घातला.

निष्ठावंतांना डावलल्याने महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी एक महिला पदाधिकारी बेशुद्धही पडली. तसेच एकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

भाजप पक्ष मोठा झाला म्हणून जुन्या कार्यकर्त्यांना विसरत आहे. आम्ही अंगावर 18-18 केसेस घेतल्या, त्यामुळे पक्ष वाढला असा दिव्या उल्हास मराठे या महिला पदाधिकाऱ्याने केला. त्यांनी प्रभाग क्रमांक 20 मधून तिकीट मागितले होते. मात्र त्यांना डावलून भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीला तिकीट देण्याला आरोप त्यांनी केला.

पक्षासाठी नोकरी सोडली, रक्ताचे पाणी केले… आणि नवीन माणसांना उमेदवारी दिली, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केली. आम्ही एकनिष्ठ नाही का? पक्षाच्या नावावर दुकानदाऱ्या केल्या का? असा सवाल कार्यकर्त्यांनी केली. संभाजीनगरमध्ये भाजपचा पराभव करणार असा विडाही भाजप कार्यकर्त्यांनी उचलला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळाबाईची मिंध्यांशी फारकत, अखेर युती तुटली

Comments are closed.