राज ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळी उडाली आहे. अवघ्या देशाचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. इथे ठाकरे ब्रँड एकत्र असल्यामुळे मुंबईकरांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले.
मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये शिवसेना-मनसेची युती झालेली आहे. या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर राज ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.