31st डिनरसाठी बनवा हे विविध पदार्थ, पार्टी होईल एकदम झक्कास
31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करतात. 31 st पार्टी म्हटले की, गेम्स, थीम, गप्पागोष्टी आणि खाणं-पिणं या गोष्टी आल्या. खाण्यापिण्याची गोष्ट आली की घरातील स्त्रीला जेवायला काय करायचं असा प्रश्न आपसुकच पडतो. तुमची हीच चिंता आज आम्ही सोडवणार आहोत. आजच्या लेखात जाणून घेऊयात लहान मुले ते घरातील मोठी मंडळी डिनरमध्ये आवडीने खातील असे पदार्थ.
पनीर टिक्का –
पनीर टिक्का लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना खायला आवडणारा पदार्थ आहे. त्यामुळे डिनरमध्ये तुम्ही मसालेदार पनीर ग्रिल करून सर्व्ह करू शकता. हा टिक्का कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
मिरची पनीर –
पनीर टिक्का घरी कायम बनवत असाल तर मिरची पनीर ट्राय करा किंवा स्टार्टरसाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. मुलांना हा पदार्थ खूप आवडेल.
हेही वाचा – New Year 2026: घरातच सेलिब्रेट करा धम्माल ‘न्यू इयर पार्टी’
दाल मखनी –
मेन कोर्समध्ये तुम्ही दाल मखनी बनवू शकता. दाल मखनीसोबत नान किंवा जीरा राईस बनवा. फक्त पाहूण्यांना सर्व्ह करण्याआधी गरम करण्यास विसरू नका.
ब्राऊनी –
नवीन वर्षाची सुरूवात चॉकलेट ब्राउनी बनवून करता येईल. ट्रेडिशनल मिठाईपेक्षा चॉकलेट ब्राउनीने पाहूण्यांचे तोंड गोड करू शकता.
चाट –
चाट हा प्रकार सगळ्यांचा आवडता आहे. भेळपूरी, रगडा पूरी, रगडा पॅटीस असे चाटचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. यात मूग, काकडी, टोमॅटो यांचा वापर करण्यात येतो तर चिंचगुळाची आंबट-गोड चटणी, तिखट चटणी आणि फरसाण यांनी चाटची चव आणखी दुप्पट होते.
हेही वाचा – Party Menu : घरच्या घरी बनवा हे भन्नाट स्नॅक्स अन् घ्या 31St पार्टीची मजा
Comments are closed.