Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
नागपुरात उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या योगेश गोन्नाडेंवर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच काळाचा घाला घातला..अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी योगेश गोन्नाडेंच्या आईचं निधन झालं..उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी धावपळ सुरू असलेल्या योगेश गोन्नाडेंनी आईच्या मृत्यूमुळे उमेदवारीची आशाच सोडून दिली होती. मात्र अशा अडचणीच्या प्रसंगी शिवसेनेने आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची आठवण ठेवली.. आणि योगेश यांच्या आईचे अंत्यसंस्कार सुरू असताना, अगदी स्मशानभूमीत जाऊन आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला एबी फॉर्म दिले.. त्यानंतर योगेश गोन्नाडे यांनी आईच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले.. आणि तीन वाजतांना काही मिनिट शिल्लक असताना महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालय मध्ये जाऊन प्रभाग पाच मधून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला…
इतर बातम्या – 30 DEC 2025
तिकीट नाकारल्यानं संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा विस्फोट…भाजपाच्या कार्यालयासमोर इच्छुकांचा आक्रोश…१८ केसेस अंगावर घेऊनही तिकीट मिळालं नसल्यानं महिला इच्छुकाचा संताप…
शेवटच्या दिवशी एबी फॉर्मसाठी इच्छुकांची भाऊगर्दी…नाशिकमध्ये शहराध्यक्ष सुनील केदारांचा इच्छुकांकडून पाठलाग…तर आयातांना उमेदवारी दिल्यानं जवळपास सर्वच पक्षांत बंडखोरी…
२९ महानगरपालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली… राज्यभरात विविध ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदावांकडून शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल…पण युती-आघाड्याचं चित्र अजून स्पष्ट नाही…
छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना ऊत… भाजपच्या हट्टीपणामुळे युती तुटल्याचा शिरसाटांचा आरोप.. तर सीटिंग नगरसेवकांच्या जागा कशा देणार, भाजपचा सवाल
राज्यात कुठेही महायुती तुटली नाही, उदय सामंतांचा दावा…अर्ज भरले असले तरी दोन-तीन दिवसांत जागावाटप निश्चित करण्याचा निर्धार…

Comments are closed.