श्रेयस अय्यरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, न्यूझीलंड मालिकेबाहेर जाण्याची शक्यता! तर 'या' खेळाडूला मिळणार मोठी संधी
टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas iyer) लवकरच फिट होऊन विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळेल, अशी आशा होती. मात्र, ताज्या अपडेटनुसार त्याला मैदानात परतण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान क्षेत्ररक्षण करताना श्रेयस गंभीर जखमी झाला होता. या दुखापतीमुळे आणि उपचारांमुळे त्याचे 6 किलो वजन कमी झाले आहे.
श्रेयसने थोडे वजन वाढवले असले, तरी त्याच्या शरीरातील ताकद (Strength) आणि स्नायूंची ताकद (Muscle Mass) अजून पूर्ववत झालेली नाही. त्याला फलंदाजी करताना अडचण येत नाही, पण पूर्ण ताकद मिळवण्यासाठी अजून 7 ते 10 दिवस लागू शकतात. रिपोर्टनुसार, 9 जानेवारीच्या आसपास श्रेयसला पूर्णपणे ‘फिट’ घोषित केले जाऊ शकते.
श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तो थेट विजय हजारे ट्रॉफीच्या नॉकआउट सामन्यांमध्ये पुनरागमन करू शकतो. जर श्रेयस अय्यर फिट झाला नाही, तर निवड समिती ऋतुराज गायकवाडला (Ruturaj gaikwad) संधी देऊ शकते. ऋतुराजने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 83 चेंडूत 105 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे श्रेयसच्या जागी ऋतुराजचा विचार प्रबळ ठरत आहे.
Comments are closed.