CBSE बोर्ड विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक बदलले, सुधारित तारखा जाहीर

दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 3 मार्च 2026 रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. फक्त 3 तारखेला होणाऱ्या परिक्षेत बदल केला असून उर्वरित सर्व परीक्षा मूळ वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण मंडळाने अधिकृत नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीची 3 मार्च रोजी होणारी परीक्षा आता 11 मार्च 2026 रोजी घेतली जाईल. तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 मार्च रोजी होणारी परीक्षा ही 10 एप्रिल 2026 रोजी आयोजित केली आहे. हा मोठा बदल लक्षात घेता, बारावीच्या विद्यार्थ्यांना या विषयाच्या तयारीसाठी आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळांना या बदलाची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित तारखा विद्यार्थ्यांच्या ‘प्रवेशपत्रावर’ (Admit Card) देखील नमूद केल्या जातील. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोंधळाशिवाय मूळ वेळापत्रकानुसार इतर विषयांचा अभ्यास सुरू ठेवावा आणि अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या शाळेच्या संपर्कात राहावे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

Comments are closed.