दमदार कामगिरीचा शेफाली वर्माला मोबदला! आयसीसी रँकिंगमध्ये दीप्ती शर्माचा दबदबा कायम
श्रीलंका विरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत तुफान फटकेबाजी करणाऱ्या शेफाली वर्माला (Shafali verma) तिच्या कामगिरीचे फळ मिळाले आहे. तिने रँकिंगमध्ये चार स्थानांची प्रगती करत 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
शेफाली वर्माने 4 सामन्यांत 185 स्ट्राईक रेटसह 2 अर्धशतके 236 धावा केल्या. ताज्या रँकिंगमध्ये ती आता 6 व्या नंबरवर आहे. स्मृती मानधनाने (Smriti Mandhna) चौथ्या सामन्यात 80 धावांची खेळी करून तिने आपले रँकिंगमधील स्थान टिकवून ठेवले आहे.
जेमिमाला (Jemimah Rodrigues) एका स्थानाचा फटका बसला असून ती आता 10 व्या क्रमांकावर गेली आहे. दीप्ती शर्माने (Deepti Sharma) जगातील नंबर 1 ची गोलंदाज म्हणून तिचे वर्चस्व कायम आहे. रेणुकाने (Renuka Singh) 8 स्थानांची मोठी झेप घेत 6 वे स्थान गाठले आहे. तिने तिसऱ्या सामन्यात 21 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या.
श्री चरणी (Shree Charani) या लेग स्पिनरने 17 स्थानांची प्रगती करत 52 व्या क्रमांकावर मजल मारली आहे. भारतीय संघ सध्या या मालिकेत 4-0 ने पुढे आहे. चौथ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 30 धावांनी पराभव केला. शेफालीच्या 46 चेंडूंतील 79 धावांच्या जोरावर भारताने आपला सर्वोच्च स्कोर उभा केला होता.
Comments are closed.