भारताने प्रमुख शस्त्रास्त्र खरेदी करार केले आहेत.
भूसेना, नौसेना आणि वायुसेनेचे बळ वाढणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाच्या सुरक्षेसंबंधी निर्माण होणारया कोणत्याही आव्हानांना परतविता यावे यासाठी भारताने मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करार केले असून त्यामुळे भूसेना, नौसेना आणि वायुसेना यांचे सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे करार एकंदर 4 हजार 666 कोटी रुपयांचे आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
हे करार भारतातीलच दोन कंपन्यांशी करण्यात आले आहेत. त्यामुळे भारताच्या सेनादलांना 4 लाख 25 हजार कार्बाइन्स मिळणार आहेत. त्यांचा उपयोग हातघाईच्या संघर्षात प्रभावीपणे करता येणार आहे. तसेच भारताच्या नौदलाला या कराराच्या अंतर्गत 48 अवजड पाणसुरुंगही (हेवीवेट टोर्पेडोज) मिळणार आहेत.
भारत फोर्ज करार
भारत फोर्ज या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीही कार्बाइन्सचा करार करण्यात आला असून तो 2 हजार 270 कोटी रुपयांचा आहे. या कंपनीकडून या कार्बाइन्सचे सुटे भाग आणि इतर साधनेही पुरविली जाणार आहेत. असाच करार पीएलआर सिस्टिम्स या कंपनीशीही करण्यात आला आहे. ही कंपनी अदानी उद्योगसमूह आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे स्थापन केली असून ती अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे दोन्ही करार संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले आहेत.
भारत फोर्जचा वाटा 60 टक्के
संरक्षण विभाग विकत घेणार असणाऱ्या कार्बाइन्सपैकी 60 टक्के पुरवठा भारत फोर्ज या कंपनीकडून होणार असून उरलेला पुरवठा पीएलआर सिस्टिम्स कडून केला जाणार आहे. दोन्ही कंपन्या सुटे भागही पुरविणार आहेत. ही कार्बाइन्स बऱ्याच अंशी भारत निर्मित असल्याने त्यांचे तंत्रज्ञानही भारताला अवगत आहे. परिणामी, त्यांचे उत्पादन केव्हाही आवश्यकतेप्रमाणे भारतातच केले जाऊ शकणार आहे. संरक्षण साधन निर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या करारांकडे पाहण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
अंडरटनेल करार
48 अत्याधुनिक अवजड पाणसुरुंग पुरविण्याचा 1 हजार 896 कोटी रुपयांचा करार डब्ल्यूएएसएस सबमरीन सिस्टिम्स या कंपनीशी करण्यात आला आहे. हे पाणसुरुंग ‘ब्लॅक शॉर्क’ म्हणून परिचित आहेत. भारताच्या स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्यांसाठी त्यांची विशेष निर्मिती करण्यात आली असून ते शत्रूच्या पाणबुड्या किंवा युद्धनौकांचा वेध अचूकपणे घेऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
Comments are closed.