New Year Vastu Tips : नववर्षाच्या पहिल्या दिवशी करा या गोष्टी, वर्षभर मिळतील शुभ परिणाम

येणारे नवीन वर्ष सुख, समाधानात आणि आरोग्यमय जावे असे प्रत्येकाला वाटते. नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही तास उरले आहेत. यामुळे सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. कित्येकजण नवीन वर्षाची सुरूवात एकमेकांना शुभेच्छा देत, देवांचे आशीर्वाद घेऊन करतात. देवाची कृपा आपल्यावर सदैव राहावी अशी इच्छा यामागे असते. त्यानुसार नवीन वर्ष सुख-समाधानात जावे यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी काय करायला हवे? ज्योतिषशास्त्रात यावर काय उपाय सांगितले आहेत जाणून घेऊयात.

लवकर उठणे –

वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रम्हमुहूर्तावर उठावे. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा चिमूटभर हळद मिक्स करा आणि या पाण्याने अंघोळ करावी. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा शरीराला मिळेल.

सूर्यदेवाला अर्घ्य द्या –

अंघोळ झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा. यासाठी कलशात पाणी, अक्षदा घ्या आणि सूर्याला नमस्कार करावा. यामुळे मान-सन्मानात वाढ होईल.

हेही वाचा – New Year 2026: नववर्षात घरात ‘या’ दिशांना लावा ही रोपं , बदलेल नशीब

गणेशपूजा –

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने केली जाते. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या दिवशी गणेशाची पूजा करावी, मंदिरात जाऊ शकता. बाप्पाला मनोभावे येणाऱ्या वर्षात कोणतीही विघ्न आणू नकोस अशी प्रार्थना करावी.

तुळशीजवळ दिवा –

सकाळी अंघोळ, देवाची पूजा झाल्यावर तुळशीजवळ दिवा लावावा. तुपाचा दिवा लावलात तर उत्तमच असेल. तुळशीजवळ दिवा लावल्याने आर्थिक अडचणी येत नाहीत असे सांगितले जाते.

धर्मादाय –

वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गरजूंना, गरिबांना दान करून करता येईल. यात तुम्ही अन्न, ब्लॅंकेट किंवा कपडे दान करू शकता. दानधर्म हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. दानधर्म केल्याने शनी आणि राहूचे दोष कमी होतात.

हेही वाचा – Vastu Tips : नवीन वर्षात आणा या गोष्टी; वर्ष जाईल सुख-समाधानात

Comments are closed.