शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वेंना कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

एकनाथ शिंदे गटाचे आमदार आमदार प्रकाश सुर्वे यांना संतप्त कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. महापालिका निवडणुकीचा प्रभाग क्रमांक 3 भाजपला सोडल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास उरलेला असताना मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असंतोष उफाळून आला. या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार वैष्णवी पुजारी यांना डावलून बाहेरचा उमेदवार भाजपकडून लादण्यात आल्याने याचा निषेध करण्यात आला. शिंदे गटाचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत आमदार प्रकाश सुर्वे आणि उमेदवार प्रकाश दरेकर यांचा जोरदार निषेध नोंदवला. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी इतर मतदारसंघात तडजोड करावी लागल्याने हा मतदारसंघ भाजपला गेल्याचा दावा प्रकाश पुजारी यांनी केला आहे. तसेच या ठिकाणी कार्यकर्त्यांना अंधारात ठेऊन वरिष्ठांनी बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्याचे वैष्णवी पुजारी यांनी म्हटले आहे.

Comments are closed.