महायुतीत बिघाडी, आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारण तापलं; काळे -निलंगेकरांमध्ये वाक्ययुद्ध पेटलं!
लातूर महानगरपालिका निवडणूक 2026 : लातूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती (MahaYuti) तुटल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसची ‘बी-टीम’ असल्याचा आरोप करत युती तुटण्यास त्यांनाच जबाबदार धरले. तसेच स्थानिक नेत्यांनी युती होण्यात मिठाचा खडा टाकला असाही आरोप केला. (Abhimanyu Pawar Vs Sambhaji Patil Nilangekar)
Vikram Kale : आमच्यात कुठलीही बी-टीम नाही, आमची फक्त ‘ए-टीम’
दुसरीकडेया आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संभाजी पाटील निलंगेकर हे माजी मंत्री असून त्यांच्या तोंडून अशा प्रकारचे वक्तव्य येणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांच्याशी सन्मानाने चर्चा करण्यासाठी गेलो होतो. आमच्यात कुठलीही बी-टीम नाही, आमची फक्त ‘ए-टीम’ आहे. बी-टीम असतील तर त्या त्यांच्या पक्षात असतील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, माजी आमदार बसवराज पाटील मुरूमकर भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांना न आणता ते एकटेच आमच्याशी चर्चा करत राहिले. तो त्यांचा निर्णय आहे. असा टोला आमदार विक्रम काळे यांनी लगावलाहे. महायुतीतील ही उघड फूट आणि नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे लातूर महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, आगामी दिवसांत आरोप–प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लातूर महानगरपालिका निवडणूक 2026 : लातूर महानगर पालिका निवडणूक -2026
एकूण प्रभाग 18 – जागा 70
भाजप – 70 सर्व जागा स्वतंत्र लढत आहे
काँग्रेस – 65 वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून 70 पैकी 65 जागेवर काँग्रेस पाच जागेवर वंचित बहुजन आघाडी
वंचित. – ०५
राष्ट्रवादी अजित पवार गट – 60 दहा जागेवर पुरस्कृत उमेदवार देणार… अशाच 70 जागा लढत आहे (उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल)
राष्ट्रवादी शरद पवार गट – 17 जागेवर अधिकृत उमेदवार आहेत.. स्वतंत्र लढत आहे
शिवसेना शिंदे – 11 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत..स्वतंत्र लढत आहे
शिवसेना ठाकरे – 09 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत..स्वतंत्र लढत आहे
एमआयएम -09 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत..स्वतंत्र लढत आहे
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.