चार्टर्ड अकाउंटंटला चढला अभिनयाचा फिव्हर; सगळं सोडून करण जोहरच्या चित्रपटातून केली बॉलिवूड एन्ट्री – Tezzbuzz

चित्रपटसृष्टीची झगमग, ग्लॅमर आणि प्रसिद्धी कुणाला भुरळ घालत नाही? लक्झरी आयुष्य, अमाप पैसा आणि ओळख मिळवण्याचं स्वप्न अनेकांना बॉलीवूडपर्यंत घेऊन येतं. अनेक जण आपली सुरक्षित नोकरी सोडून अभिनयाच्या संघर्षमय वाटेवर पाऊल टाकतात. अशाच कलाकारांच्या यादीत आता नवोदित अभिनेता मोहित नेहरा याचं नाव सामील झालं आहे. यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट असूनही अभिनयाच्या ओढीने त्यांनी आपलं स्थिर करिअर सोडलं आणि आता पहिल्याच चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या चर्चेत आले आहेत.

बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधी मोहित नेहराने सात वर्षे अभिनयाचं औपचारिक प्रशिक्षण घेतलं. थिएटर केलं, अभिनय कार्यशाळा केल्या आणि सातत्याने ऑडिशन्स दिले. अनेकदा नकार पचवावे लागले, तरीही त्यांनी हार मानली नाही. अखेर त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि धर्मा प्रॉडक्शनच्या (Dharma Productions)‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटातून त्यांना पदार्पणाची संधी मिळाली.

मोहित नेहरा मूळचे रोहतकचे आहेत. त्यांनी रोहतकमधील डीजीवी स्कूलमधून १२ वीपर्यंत शिक्षण घेतलं. पुढील शिक्षणासाठी ते दिल्लीत गेले आणि चार्टर्ड अकाउंटंट झाले. मात्र, मनात अभिनेता होण्याचं स्वप्न सतत रुंजी घालत होतं. त्यामुळे सुरक्षित आणि यशस्वी करिअर सोडून त्यांनी थिएटरकडे मोर्चा वळवला आणि नंतर मुंबई गाठली.

मुंबईत आल्यानंतर संघर्ष सोपा नव्हता. सलग तीन-चार वर्षे ऑडिशन्स, प्रतीक्षा, नकार आणि अपयश यांचा सामना करावा लागला. अनेकदा खचण्याची वेळ आली, पण त्यांनी संयम आणि चिकाटी सोडली नाही. अखेर त्याच संयमाचं चीज झालं.

‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा मोहित नेहराचा पहिला चित्रपट आहे. समीर विद्वान्स दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मोहित या चित्रपटात कॅनडातून आलेल्या एनआरआय सुखीची भूमिका साकारत आहेत, जो सामाजिक दबावापेक्षा आपल्या प्रेमाला प्राधान्य देतो. पहिल्याच चित्रपटातून मिळालेली ओळख आणि चर्चा पाहता, मोहित नेहरा हे नाव येत्या काळात बॉलीवूडमध्ये अधिक ठळकपणे ऐकू येईल, यात शंका नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

ना ‘धुरंधर’, ना ‘छावा’ – 50 लाखांच्या बजेटमधील या चित्रपटाने 120 कोटी कमावून रचला इतिहास

Comments are closed.