सावे, कराड यांचा फोटो फाडला; गाडीला घेराव, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपातील नाराज इच्छुकांचा सलग दुसऱ्या दिवशीही राडा

छत्रपती संभाजीनगर येथे सलग दुसऱ्या दिवशी भाजपातील नाराज इच्छुकांचा उद्रेक पाहायला मिळाला. भाजप कार्यालयात काल राडा घातलेल्या ‘लाडक्या बहिणी’ आज थेट उपोषणाला बसल्या. तर दुसरीकडे नाराज भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार भाजप कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला. यावेळी त्यांच्याविरोधात तुफान घोषणाबाजी करण्यात आली.
बुधवारी सकाळीच भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी कार्यालयावर धडक दिली. खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांना नाराज कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत रोखले. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या बोनेटवर जोरजोरात हात आपटत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अतुल सावे यांच्याही गाडीला घेराव घालण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवले आणि सावे, कराड यांनी तिथून पळ काढला.

Comments are closed.