पोर्तुगालमध्ये समंथा रूथ, रोममध्ये पोहोचली रश्मिका मंदाना; न्यू इयर वेकेशनला कोणकोणते सेलिब्रिटी फिरत आहेत? जाणून घ्या – Tezzbuzz

सध्या नवं वर्ष साजरं करण्यासाठी बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी परदेशात सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. २०२५ च्या स्वागतासाठी कलाकारांनी वेगवेगळ्या देशांची निवड केली असून सोशल मीडियावर त्यांच्या ट्रॅव्हल फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)सध्या पोर्तुगालमध्ये सुट्टी घालवत आहे. १ डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत विवाहबंधनात अडकलेल्या समंथाने लग्नानंतरचा हा पहिलाच मोठा ट्रिप असल्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिने पोर्तुगालमधील सुंदर लोकेशन्सवरचे फोटो शेअर करत चाहत्यांना खास झलक दाखवली आहे.

दुसरीकडे, करीना कपूर  पती सैफ अली खान आणि दोन्ही मुलांसोबत स्वित्झर्लंडमध्ये वेळ घालवत आहे. बर्फाच्छादित डोंगर, सुंदर दऱ्या आणि आल्हाददायक वातावरणात कुटुंबासोबत सुट्टी साजरी करतानाचे फोटो ती सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. करीना याआधीही दरवर्षी हिवाळ्यात स्वित्झर्लंडला जाणे पसंत करते.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे देखील सध्या सुट्टीवर आहेत. नुकतेच न्यूयॉर्कमधील एका पार्टीतील त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. याशिवाय, दीपिकाच्या मैत्रिणीने शेअर केलेल्या फोटोंमधून ती लास वेगासमध्ये मैत्रिणींसोबत वेळ घालवत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, अभिनेत्री रश्मिका मंदाना लग्नाच्या चर्चांमध्ये असतानाच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रोमला पोहोचली आहे. तिने तिच्या इटली ट्रिपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, या सुट्टीत विजय देवरकोंडाही तिच्यासोबत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मौनी रॉय सध्या तिची मैत्रीण दिशा पटानीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. समुद्रकिनाऱ्यावरचे ग्लॅमरस फोटो दोघींनीही शेअर केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी मौनी उत्तराखंडमध्ये सुट्टीवर होती.

याशिवाय रणबीर कपूर–आलिया भट्ट, वीर पहाडिया आणि तारा सुतारिया यांसारखे अनेक सेलिब्रिटीही सुट्टीवर गेले असून त्यांनी अद्याप आपली ठिकाणे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, अभिनेत्री श्रिया सरन पती आणि मुलीसोबत विमानतळावर दिसली. एकूणच, २०२५ च्या स्वागतासाठी बॉलीवूडमधील स्टार्स परदेशात धमाल करताना पाहायला मिळत आहेत.

‘मुझसे शादी करोगी…’ गाण्यावर थिरकला निक जोनस, देसी गर्लसाठी दाखवलं प्रेम; युजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया

Comments are closed.