टी20 वर्ल्ड कप 2026 साठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर; नेतृत्वाची धुरा 'या' स्टार खेळाडूकडे
टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन पुढील वर्षी होणार असून, स्पर्धेच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतशा सहभागी संघांकडून आपापले स्क्वॉड जाहीर केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या आगोदरच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) आपल्या वर्ल्ड कप संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी लेगस्पिनर राशिद खानकडे सोपवण्यात आले आहे, तर इब्राहिम झादरानला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
या संघात ऑलराउंडर गुलबदीन नैब आणि वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांची तब्बल एका वर्षानंतर पुनरागमन झाले आहे. दोघेही खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, नवीन उल हकने आपला शेवटचा टी20 सामना डिसेंबर 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे खेळला होता. त्यांच्या पुनरागमनामुळे अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजीला अधिक धार मिळणार आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने केवळ टी20 वर्ल्ड कपसाठीच नव्हे, तर वेस्टइंडीजविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठीही हाच संघ जाहीर केला आहे. वर्ल्ड कपपूर्व तयारीचा भाग म्हणून अफगाणिस्तान आणि वेस्टइंडीज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 19 ते 22 जानेवारी दरम्यान UAE मध्ये होणार असून, याची अधिकृत यजमान अफगाणिस्तान असेल.
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अफगाणिस्तानला गट ‘ड’ मध्ये स्थान देण्यात आले असून, या गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, युनायटेड अरब अमीरात आणि कॅनडा यांचा समावेश आहे. अफगाणिस्तान आपला पहिला सामना 8 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.
T20 विश्वचषक 2026 साठी अफगाणिस्तान संघ: राशिद खान (कर्णधार), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, दरविश रसौली, शहिदुल्ला कमाल, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नहीब, गुलबद्दीन, मुहम्मद नाइब, मुहम्मद उरबन, मुहम्मद नहीब, नाइब, मुहम्मद. उल हक, फजल हक फारुकी, अब्दुल्ला अहमदझाई.
राकीव: एएम गझनफर, इजाज अहमदझाई, झिया उर रहमान शरीफी.
Comments are closed.