सोलापूर-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात, थरकाप उडवणारे फोटो आले समोर

सोलापूर-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसला भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास तेलंगवाडी येथे हा अपघात झाला.

मुंबईवरून हैदराबादकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसला (क्र. एनएल 21, बी 1869) सोलापूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली.

जोरदार धडकेमुळे ट्रॅव्हल बसचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. सुदैवाने ट्रॅव्हल बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले.

अपघातामुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील गस्तीपथक, रुग्णवाहिका पथक आणि मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी किरण आवताडे (PSI) आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

खासगी ट्रॅव्हल बस वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Comments are closed.