शमीच्या पुनरागमनाचे संकेत! घरगुती क्रिकेटमधील खेळावर बीसीसीआयची कडक नजर
मोहम्मद शमी (Mohmmed Shami) गेल्या बराच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2025 मध्ये खेळला होता. या संपूर्ण वर्षात निवडकर्त्यांनी त्याला कोणत्याही स्वरूपाच्या (Format) संघात स्थान दिलेले नाही, ज्यामुळे शमीच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेषत 2027 च्या विश्वचषकाच्या नियोजनात शमीचा विचार केला जाणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
तत्पूर्वी, बीसीसीआयच्या एका सूत्राने ‘एनडीटीव्ही’शी बोलताना स्पष्ट केले की, शमी अजूनही बीसीसीआयच्या नियोजनाचा भाग आहे. त्यांनी सांगितले की, शमीच्या घरगुती क्रिकेटमधील कामगिरीवर बीसीसीआयची कडक नजर आहे आणि तो निवडीच्या शर्यतीतून अजिबात बाहेर पडलेला नाही.
आता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेत मोहम्मद शमीचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते.
Comments are closed.