अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, संभाजीनरमध्ये लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalike election : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. कुठं युत्या तर कुठं आघाड्या झाल्या आहेत. काही इच्छुक असणाऱ्यांना पक्षाने संधी दिलेली नाही, तर कुठं दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला संधी देणयात आली आहे. यामुळं राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप सोडून ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या माजी उप महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

अर्ज भाजपच्या नावाने, एबी फॉर्म हा शिंदेंच्या शिवसेनेचा दिला

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी उप महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. भाजप सोडून ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होता.  त्यांनी बीजेपीच्या नावाने अर्ज भरला होता. तर एबी फॉर्म हा शिंदेंच्या शिवसेनेचा दिला होता. त्यामुळं माजी उप महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती अखेर तुटली आहे. जागावाटपावरून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस संपुष्टात आली असून, दोन्ही पक्ष आता महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहेत. एकेकाळी भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या शहरात युतीची शक्यता वर्तवली जात होती, परंतु अंतर्गत मतभेदामुळे ही चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर याला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 50 ओबीसी आरक्षित झाल्यामुळे दीपकला वॉर्ड क्रमांक 55 मधून उमेदवारी हवी होती, मात्र ती हर्ष भार्गव पटेल यांना देण्यात आली. भाजप कार्यकर्ते विक्रम राजपूत यांना वॉर्ड 50 मधून उमेदवारी मिळाली आहे. संजय शिरसाट यांनी युती चर्चेदरम्यान योग्य प्रतिसाद न मिळाल्याचे वक्तव्य केले होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटच्या दिवशी  दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात एकत्र असलेल्या भाजपा-शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात महापालिका निवडणुकीमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. भाजपाने जवळपास बहुतांश ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवले आहे. तर शिंदेसेनेला सोबत घेतले. मात्र, महत्त्वाच्या महापालिकांमध्ये शिंदेसेना आणि भाजपाचा खेळ बिघडला आहे. पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटली आहे.

महत्वाच्या बातम्या:

खैरे साहेबांनी मार्क केलेल्या लोकांना तिकिट दिलंय, आमच्यात कोणताही वाद नाही, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

आणखी वाचा

Comments are closed.