धक्कादायक! श्रीरामपूरमध्ये भरदिवसा गोळीबार, जामिनावर असलेल्या बंटी जहागिरदारचा मृत्यू

अहिल्यानगर क्राईम न्यूज: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी सलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदारवर गोळ्या झाडल्या आहेत. यानंतर तातडीने जहागिरदारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान जहागिरदारचा मृत्यू झाला आहे.

गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपुरात तणावाची परिस्थिती

पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा बंटी जहागिरदार याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भरदिवसा गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी जहागिरदार याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये बंटी जहागिरदार यांचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयाच उपचार सुरु होते. गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपुरात तणावाची परिस्थिती आहे. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार 2023 पासून जामिनावर बाहेर आहे. बंटी जहागिरदार याच्यावर गोळीबार झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. शहरात तणावाची परिस्थिती आहे.

नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरु

श्रीरामपूर येथील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याचा उपचारादरम्यान मृत्यू. झाल्यानं शहरात तणावाची स्थिती आहे. बंटी जहागिरदारवर श्रीरामपूर शहरात भर दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. हल्ल्यात बंटी जहागिरदारला गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान झाला त्याचा मृत्यू झाला आहे. राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रात बंटी जहागीरदार याच नाव असल्याने नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा काम सुरु केलं असून आरोपीच्या शोधासाठी पाच टीम रवाना करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात धक्कादायक घटना, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची निघृण हत्या

गडचिरोली (Gadchiroli ) जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर त्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. देवानंद सूर्यभान डोंगरवार असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.

आणखी वाचा

Comments are closed.