2026 मध्ये ‘हे’ पाच दिग्गज खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

क्रिकेटपटू 2026 मध्ये निवृत्त होऊ शकतात: संपूर्ण जग उद्यापासून नवीन वर्षात प्रवेश करणार आहे. 2025 मध्ये क्रिकेट जगतात चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि महिला वनडे वर्ल्ड कप यासारख्या मोठ्या स्पर्धा झाल्या. अनेक क्रिकेटपटूंनी विक्रम प्रस्थापित केले आहेत. परंतु अनेक दिग्गजांनीही निवृत्ती देखील घेतली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर स्टीव्ह स्मिथने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, निवृत्तीचा हा ट्रेंड 2026 मध्येही सुरू राहू शकतो. 2026 मध्ये कोणकोणते खेळाडून निवृत्त होऊ शकतात याबाबतची माहिती पाहुयात.

हे 5 क्रिकेटपटू 2026 मध्ये निवृत्त होऊ शकतात

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि काही वर्षांतच तो टी 20 संघाचा कर्णधार बनला आहे. 2026 च्या टी 20 विश्वचषकात तो टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल, परंतु सूर्याचा खराब फॉर्म त्याच्या कारकिर्दीला खीळ घालू शकतो. त्याच्या शेवटच्या 25 टी20  सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने फक्त 244 धावा केल्या आहेत. 2024 च्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर त्याने अर्धशतक झळकावलेले नाही. जर सूर्यकुमारने या खराब फॉर्मवर मात केली नाही, तर त्याच्या कारकिर्दीचा शेवट फार दूर दिसत नाही.

ग्लेन मॅक्सवेल

37 वर्षीय ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मॅक्सवेलने 2017 पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही आणि सध्या तो फक्त टी-20 स्वरूपात सक्रिय आहे. 2026 चा टी-20 विश्वचषक मॅक्सवेलचा शेवटचा मोठा स्पर्धा असण्याची शक्यता आहे, कारण ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड 2028 साठी नवीन संघ तयार करण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत, मॅक्सवेलला त्याच्या कारकिर्दीबाबत कठीण निर्णय घ्यावा लागेल.

डेव्हिड मिलर

डेव्हिड मिलर 2010 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 7000 हून अधिक धावा केल्या आहेत. 2024 च्या टी-20  विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी विश्वचषक जिंकण्याचे मिलरचे स्वप्न अपूर्ण राहिले. 2026 मध्ये तो आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकण्याचा शेवटचा प्रयत्न करू शकतो.

मोहम्मद नबी

गेल्या वर्षी, अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद नबी म्हणाला होता की चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्याची 50  षटकांच्या फॉरमॅटमधील शेवटची मोठी स्पर्धा असेल. नबीने पुढे म्हटले की तो त्यानंतर आणखी एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. त्या विधानाच्या आधारे, 2026 च्या टी-20 विश्वचषकात नबी शेवटच्या वेळी अफगाणिस्तानच्या जर्सीमध्ये दिसू शकतो.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे जुलै 2023 पासून भारतीय संघाकडून खेळलेला नाही. रहाणे वरच्या फळीत फलंदाजी करतो, परंतु सध्या व्हाईट बॉल संघात 4 व्या क्रमांकावर जागा रिक्त नाही. कसोटी संघाला ३ व्या क्रमांकाचा फलंदाज हवा आहे, ज्याचे अनेक वेळा प्रयोग झाले आहेत. तथापि, गौतम गंभीरच्या व्यवस्थापनाखाली, रहाणेच्या पुनरागमनाची शक्यता कमी आहे. निवृत्ती हा त्याच्यासाठी एकमेव पर्याय असल्याचे दिसते.

आणखी वाचा

Comments are closed.