जो रूटचा कसोटीतील नंबर वनचा मुकुट धोक्यात, शुभमन गिलचे टॉप 10 मध्ये पुनरागमन
त्या सामन्यात इंग्लंडने चार गडी राखून विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियात 18 कसोटी सामन्यांनंतर प्रथमच कसोटी जिंकली. मात्र, सांघिक विजयानंतरही जो रूटची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक ठरली. पहिल्या डावात तो खाते न उघडता बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याने केवळ 15 धावा केल्या. याउलट हॅरी ब्रूकने छोटी पण प्रभावी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
ब्रुकच्या चांगल्या कामगिरीचा थेट परिणाम क्रमवारीवर झाला. तो आता कसोटी फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून अव्वल स्थानापासून अवघ्या काही गुणांनी दूर आहे. दुसरीकडे, रूटचे गुण कमी झाले आहेत, ज्यामुळे त्याचे पहिले स्थान आता पूर्णपणे सुरक्षित मानले जात नाही. दरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिलसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तो पुन्हा एकदा कसोटी फलंदाजांच्या टॉप-10 यादीत परतला आहे.
Comments are closed.